Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तर संपूर्ण राज्य अंधारात जाईल; विज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीचा इशारा

Nandurbar News : राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिने वीज कंत्राटी कामगार आजपर्यंत मुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांना अनेक वर्षात अनेक निवेदन सादर केली.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य विज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन (Nandurbar) पुकारले आहे. ५ मार्चपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल; असा इशारा वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेने शासनाला दिला आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीतील (Mahavitaran) नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेले अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीवर हजारो कामगार काम करत आहेत. राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिने वीज कंत्राटी कामगार आजपर्यंत मुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांना अनेक वर्षात अनेक निवेदन सादर केली. पत्रव्यवहार करून विविध आंदोलन मंत्रालय व आझाद मैदान तसेच वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर केली. मात्र त्याच्या शासनावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील (MSEDCl) महावितरण महापरीक्षण व महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षी नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे ४२ हजार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील ३० प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून सात वर्ष शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा, नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे, ३० टक्के पूर्वक भत्ता मिळावा; अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. आज विभागीय कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर  २८ व २९ फेब्रुवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार असून तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही. तर ५ मार्चपासून संपूर्ण राज्यातील ४२ हजार कर्मचारी हे बेमुदत उपोषणास बसतील; असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT