Dhule News : शाश्वत मानधन मिळावे; महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Dhule News : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : कर्मचाऱ्यांना शाश्वत मानधन मिळावे, यासह काही प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या (Dhule) माध्यमातून शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Breaking Marathi News)

Dhule News
Pimpri Chinchwad News : ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त; जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या (Mahavitaran) कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. जवळपास आठ ते दहा वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शाश्वत मानधनावर (MSEDCL) घेण्यात यावे. त्याचबरोबर ६० वर्षांपर्यंत या कर्मचाऱ्यांना मानधनाची शाश्वती देण्यात यावी; यासह  इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Nanded News : प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर महापालिकेची कारवाई; ४ टन प्लास्टिक जप्त

प्रशासनाविरोधात आंदोलन सुरूच 
आंदोलनाचा हा आजचा चौथा टप्पा असून आज संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले असून, पुढे देखील प्रशासनाच्या विरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब येथे हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून, राज्य सरकारच्या विरोधामध्ये यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com