Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे गुजरातमध्ये स्थलांतर; मुलांच्या शिक्षणाचेही होतेय नुकसान

Nandurbar News : यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रोजगार हमी योजनेच्या मंजूर झालेल्या कामांव्यतिरिक्त नवीन कामे सुरू झाली नाही

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : उन्हाळ्यात ग्रामीण भागात मजुरांना काम मिळत नाही. यंदा आचारसंहितेमुळे रोजगार हमी योजनेची कामे देखील नसल्याने पोट कसे भरायचे हा प्रश्न हातमजुरी करणाऱ्या परिवारासमोर आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात मजुरीसाठी स्थलांतर होत असते. 

यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रोजगार हमी योजनेच्या मंजूर झालेल्या कामांव्यतिरिक्त नवीन कामे सुरू झाली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेती कामांना देखील ब्रेक लागला आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूर वर्ग जिल्ह्याबाहेर व गुजरात राज्यात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shahada) शहादा, तळोदा, धडगाव, नवापूर तालुक्यांसह नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ग्रामीण भागातील मजूर वर्ग सध्या हाताला रोजगार मिळावा यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात तसेच गुजरात राज्यात जात असल्याचे दिसून येत आहे.

मुलांच्या शिक्षणाचे नुकसान 
जिल्ह्यात मजुरी कमी मिळत असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शोधात आदिवासी पाड्यातील नागरिक गुजरात (Gujrat) राज्याकडे स्थलांतर होत असतात. या स्थलांतरामुळे लहान चिमुकल्यांचे शिक्षणाचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. सरकारने या गोरगरीब आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT