Dhule Surat Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: धुळे- सुरत मार्गावर भीषण अपघात! ट्रकने तरुणांना १० फूट फरफटत नेले; दोघांचा मृत्यू

Dhule Surat Highway Accident: धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar Accident:

नंदूरबार जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी आहे. (Nandurbar Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली. या दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली.

दुचाकीवर एकूण तीन जण एकत्र प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की दुचाकीवरील एक युवक ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्याने आठ ते दहा फूट फरफटत गेला.

या घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून घटनेची माहिती मिळताच तात्काळ विसरवाडी पोलीस दाखल झाले. दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोर

Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

Nagpur : गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT