Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारमध्ये एक लाखाची दारू जप्त; ‘एलसीबी’ची चौघांवर कारवाई

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतुकीविरुद्ध जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतलेली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व दारूबंदी विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नंदुरबार (Nandurbar) शहरातील विविध ठिकाणी बियर शॉप विक्रेत्यांवर अवैधरीत्या परवानगी नसलेल्या देशी-विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. (LCB) यात १ लाख ५ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)


नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. (Nandurbar Police) अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतुकीविरुद्ध जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतलेली आहे. कारवाईत सातत्य ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व दारूबंदी विभागाकडून अचानकपणे मोहीम राबवून एक लाख चार हजार ५९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौघांवर गुन्हे दाखल 

सदरचा कारवाईत कल्पेश रवींद्र कासार (रा. श्रीराम चौक, देसाईपुरा, नंदुरबार), चेतन रमेश चौधरी (रा. देसाईपुरा, नंदुरबार), हेमंत दिलीप मराठे (रा. पेडकाईनगर, नंदुरबार), अर्जुन प्रकाश राजपूत (रा. हिंगलाज मातानगर, नंदुरबार) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला

मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; संतप्त महिलांचा आक्रोश|VIDEO

Matheran Travel : हिवाळ्यात माथेरानला फिरायला जाताय? मग 'या' ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या

Leopard Spotted In Ashti Taluka: बीड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Mumbai Mantralaya News : मोठी बातमी! मंत्रालयात तरुणाचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT