Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेनात; अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून प्रवास Video

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २० ते २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावात देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात दळणवळणाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत. येथे सुविधा नसल्याने मनुष्याच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मरणयातना संपत नाल्याचा अनुभव येथे येत अणे. नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावात अंत्यसंस्कार नदीच्या काठावर केले जात असतात. मात्र पूल नसल्याने अंत्यसंस्कार आणि शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.  

सातपुड्याच्या दुर्गम भागात नेहमीच आदिवासी बांधवाना समस्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र नंदुरबारच्या (Nandurbar) जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २० ते २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावात देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते. नदी दोरीच्या साह्याने किंवा होळीच्या साह्याने पार करावी लागत असते. पावसाळ्यात या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागत असते. 

मृतदेहही न्यावा लागतो होळीतून 

दरम्यान गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. नदीच्या दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने नदीतून जाण्यासाठी होळीचा वापर केला जात असतो. दरम्यान मृतदेह देखील  लागत असल्याचे येथे पाहण्यास मिळत आहे. गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT