Shivbhojan Thali 
महाराष्ट्र

पाच महिन्‍यात अडीच लाख जणांना शिवभोजनाचा लाभ

पाच महिन्‍यात अडीच लाख जणांना शिवभोजनाचा लाभ

Rajesh Sonwane

नंदुरबार : ‘ब्रेक द चेन’ च्या प्रक्रियेंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू नागरिकांना १५ एप्रिलपासून शिवभोजन थाळी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत २ लाख ५५ हजार ६१३ थाळ्या निःशुल्क दिल्या आहेत. (nandurbar-news-last-two-and-half-lakh-shivbhojan-thali-distribute-five-month)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक निर्बंध लावले होते. अशावेळी शासनाने गरजूंना एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा कालावधी वेळोवेळी वाढविला आहे. अक्कलकुवा तालुक्यात आत्तापर्यंत २७ हजार ७५१, अक्राणी ३१ हजार २८२, नंदुरबार ८८ हजार ७७५, नवापूर ३६ हजार ३२१, शहादा ३४ हजार ६२६ आणि तळोदा तालुक्यात ३६ हजार ८५८ थाळ्या निःशुल्क उपलब्ध करून दिल्या. कोरोना कालावधीत प्रत्येक केंद्राच्या इष्टांकातही दीडपट वाढ केल्याने जिल्ह्यातील १६ शिवभोजन केंद्रांवरून दररोज २५५० थाळ्या वितरित होत आहेत.

प्रारंभापासून साडेसात लाखावर लाभार्थी

राज्य शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी २६ जानेवारी २०२० पासून केवळ दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नंतर थाळीचे शुल्क ५ रुपयांपर्यंत कमी केले. दुसऱ्या लाटेवेळी कडक निर्बंध असल्याने १५ एप्रिलपासून ही थाळी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. योजनेच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत एकूण ७ लाख ८६ हजार ६७३ थाळ्यांचे वितरण झाले असून त्यांपैकी २ लाख ५५ हजार ६१३ थाळ्या निःशुल्क, ५ लाख १४ हजार ४१२ थाळ्या ५ रुपये शुल्क आकारून आणि १६ हजार ६४८ थाळ्या दहा रुपये शुल्क आकारून वितरित केल्या आहेत.

असा दिला लाभ

योजनेंतर्गत २६ जानेवारी २०२० पासून अक्कलकुवा तालुक्यात ९० हजार २६३, अक्राणी ९६ हजार ४५५, नंदुरबार २ लाख ६२ हजार ९३, नवापूर १ लाख ६ हजार २५०, शहादा १ लाख १३ हजार ९८६ आणि तळोदा तालुक्यात १ लाख १७ हजार ६२६ थाळ्यांचे वितरण केले आहे. एकूणच शिवभोजन थाळी संकटकाळात गरजू व्यक्तींना दिलासा देणारी ठरली आहे. आता १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर ही थाळी मोफत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT