Jaykumar Rawal Saam tv
महाराष्ट्र

Jaykumar Rawal : मंत्र्यांमध्ये नाराजी नाही, फक्त अंदाज बांधला जातोय; मंत्री जयकुमार रावल

Nandurbar News : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून नंदुरबार भाजपच्या वतीने मंत्री रावल यांच्या जाहीर सत्कार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र मंत्र्यांमध्ये नाराजी नसून नाराजीबाबत फक्त मिडीया अंदाज बांधत आहे. परवाच्या मंत्री मंडळ बैठकीला सर्व मंत्री हजर होते. सर्वामध्ये उत्साह असून एक नवीन मजुबत, ताकदवर आणि लोकांच्या हक्काचे सरकार आल्याची भावना आहे. आता टप्याटप्याने पालकमंत्री पदाचाही निर्णय घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून नंदुरबार भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. 

फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य एक नंबर होईल 

देवेंद्र फडवणीस धडाडीचे कार्यकर्ते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भरारी घेणार असून नंबर एकच राज्य बनवणार आहे. देवेंद्र फडवणीस हे अनुभवी आणि अभ्यासू राजकारणी आहेत. ते मागील पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. यानंतर विरोधी पक्षनेते व उपमुख्यमंत्री राहिले. आता पुन्हा मुख्यमंत्री त्यामुळे त्याच्या कार्यकाळात महाराष्ट्र प्रगती करेल; असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला आहे. 


सोयाबीन खरेदी प्रश्न लवकरच मार्गी 
सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी संपर्कात आहेत. यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. ऑक्टोंबर महिन्यात सोयाबीन खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीन खरेदीसाठी नोदंणीचा कार्यकाळ वाढवला असून राज्याचे सचिव केंद्राच्या सचिवांच्या संपर्कात असून सोयाबीन खरेदी कार्यकाळ वाढण्यासाठी पुर्ण प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे देखील या विषयावर लक्ष ठेवून असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT