गणराया 
महाराष्ट्र

पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना

पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना

दिनू गावित

नंदुरबार : देव दगडात नाही. देवळातही नाही. 'श्वास' ऑक्सिजन देणाऱ्या झाडात आहे. कला शिक्षकांने संकल्पना मांडत पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. (nandurbar-news-Installation-of-Ganaraya-in-a-tree-branch-conveying-the-message-of-environment)

नंदुरबार शहरात राहणाऱ्या एका कलाशिक्षकाने निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात गणपती साकारत त्याची प्रतिष्ठापणा केली. नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे रनाळा येथील धनराज आनंदा पाटील हे सध्या नंदुरबार शहरातील सिताईनगरात वास्तव्यास असून तालुक्यातील पथराई येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते चित्रकारासोबत शिल्पकारही आहे.

घरात वृक्षाचे शिल्प

निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱ्या‍या या अवलियाने वृक्ष संवर्धानासाठी विविध उपक्रम राबविले आहे. सर्वत्र गणरायाचे आगमन होवून त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध मंडळ, घरगुती गणेशाच्या मुर्ती खरेदी करण्यात आले आहे. यात काही शाडु मातीच्या, काही प्लास्टरऑफ पॅरीसच्या मूर्ती आहेत. शिक्षक धनराज पाटील यांनी त्यांच्या शेतात एका झाडाची तुटलेली फांदीपासून तीन वर्षापुर्वी घरात वृक्षाचे शिल्प साकारले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या शिल्पातच काहीतरी वेगळे करून पर्यावरणाचा संदेश देण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार त्यांनी यंदा गणपती मुर्ती न आणता या वृक्षातच एकही रूपयाचा खर्च न करता दिड तासात गणपती साकारला व तेथेच गणरायाची विधीवत स्थापना करत मी दगडात नाही. मी देवळातही नाही. सजीवसृष्टीला ऑक्सिजन देणाऱ्या झाडात आहे, झाडे लावा, पाणी वाचवा असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. धनराज पाटील यांनी त्यांच्या होळतर्फे रनाळा गावात वृक्ष लागवडीसाठी लेकीचे झाड, बाऊचे झाड, पुण्यस्मरणार्थ वृक्ष रोपण केले. आतापर्यंत त्यांनी 48 वृक्षांची लागवड करून जगवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

Leopard Attack : धक्कदायक! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, जबड्यात पकडलं अन्...

Winter Hairfall : हिवाळ्यात केस लवकर का गळतात? जाणून घ्या कारण

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

Breast cancer screening: ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी फक्त मॅमोग्राफी पुरेशी नाही? डॉक्टरांनी सांगितली दुसरी पद्धत

SCROLL FOR NEXT