Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : घरात सुरु होता बनावट दारूचा कारखाना; पोलिसांची छापा टाकत कारवाई

Nandurbar News : विसरवाडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत गडदाणी गावात अमृत गावीत याच्या घरामध्ये बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : देशी व विदेशी बनावट दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात होती. नंदुरबार जिल्ह्यातील गडदाणी या गावात एका घरामध्ये हा कारखाना सुरु होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकत कारवाई केली असून या ठिकाणाहून १० लाख ७९ हजार रुपये किंमतीची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.

नंदुरबारच्या विसरवाडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. दरम्यान १३ मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत गडदाणी गावात अमृत पंतु गावीत याच्या घरामध्ये बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत सदर ठिकाणी छापा टाकला. 

दारू बनविताना तिघेजण आढळले  

दरम्यान पोलीस पथकाने छापा टाकल्यानंतर अमृत गावीत यांच्या घरात तीन इसम बनावट दारु तयार करून प्लॅस्टीक टाकीतून बाटलीमध्ये भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना बनावट दारु व दारु बनविण्याच्या साहित्यासह पकडले. यात पवन सिताराम शर्मा (वय ३३), हरिष राजेंद्र चौधरी (वय ३७) व अमृत पंतु गावीत (वय ३३) यांना ताब्यात घेतले आहे. तर कच्चा माल पुरविणारा हुसेनभाई धुळेवाला याचा देखील यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

१० लाख ७९ हजाराच्या मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील १० लाख ७९ हजार ८८२ रुपये किंमतीची बनावट दारु तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य व वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चोघांविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि नरेंद्र साबळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT