Shahada Police Saam tv
महाराष्ट्र

Shahada Police : सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक; शहादा पोलिसांची मोठी कारवाई, २५ लाखाचा गुटखा जप्त

Nandurbar News : छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. प्रामुख्याने गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून प्रतिबंधित असलेल्या गुटखा, तंबाखू महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : बंदी असताना गुटखा, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची वाहतूक छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात सुगंधित तंबाखूची होत असलेली अवैध वाहतूक शहादा पोलिसांनी उधळून लावली आहे. शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पदकाने संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई करत सुमारे २५ लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व संबंधित वाहन जप्त केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर प्रकाशा गावाच्या हद्दीत शहादा पोलिसांकडून सदरची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान गुटखा, तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. प्रामुख्याने गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून प्रतिबंधित असलेल्या गुटखा, तंबाखू महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात आहे. 

पोलिसांची सापळा रचत कारवाई 

दरम्यान एका गाडीतून सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर शहादा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचत संशयित वाहन अडवले. वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला. जो विक्रीसाठी नेला जात होता.

२५ लाख रुपयांचा गुटखा जप्त 

सदरच्या कारवाईत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी कार्यवाही केली असून तंबाखू व्यवसायावर पोलिसांचा हा जोरदार बडगा असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत सुमारे २५ लाख रुपयांचा अवैध सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास शहादा पोलीस करत असून, यामध्ये आणखी काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरंच? जुन्या डिव्हाइसपासून सोनं काढणे शक्य आहे का? जाणून घ्या

स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं | Shocking

Dangerous Fish: धारदार चोच आणि ट्रेनसारखा वेग, हा आहे जगातील सर्वात धोकादायक मासा

Lucky Wife: या महिला नवऱ्याचे आयुष्य बदलतात, सुख- समृद्धीसह नशिबात भरभराट आणतात!

GK: कीबोर्डवर QWERTY फॉरमॅट का वापरला जातो? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारणं

SCROLL FOR NEXT