Amravati Corona : अमरावतीत कोरोनाचा शिरकाव; ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Amravati news : राज्यभरातील अनेक भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक घातक नसला तरी कल्याणमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे
Amravati Corona
Amravati CoronaSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता अमरावतीमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील २० दिवसात ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या परिसरात खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत असून संपर्कात असलेल्या नागरिकांचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

राज्यभरातील अनेक भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक घातक नसला तरी कल्याणमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यातील मुंबई, कल्याण, पुणे, नागपूर, सोलापूर या शहरांमध्ये कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. यानंतर आता अमरावतीमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. 

Amravati Corona
Erandol Crime : मुलाला दुकानावर बसवून वडील गेले बाहेर; मुलगा मात्र घरी परतलाच नाही, भयानक घटनेने कुटुंब हादरले

९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 

अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील २० दिवसांमध्ये ९ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १० मध्ये कोरोना वार्ड तयार करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमधील दोन सक्रिय रुग्ण  शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

Amravati Corona
Satara Crime : मुलांच्या ऍडमिशनसाठी शाळेत आला अन् चोरी करून गेला; शिक्षिकेचे दागिने लांबवीले

तात्काळ तपासणीचे आदेश 

वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला आल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून देखील उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com