Breaking News

Satara Crime : मुलांच्या ऍडमिशनसाठी शाळेत आला अन् चोरी करून गेला; शिक्षिकेचे दागिने लांबवीले

Satara News : एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये येऊन त्याने शिक्षिकेच्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी असे साधारण १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले
Satara Crime
Satara CrimeSaam tv
Published On: 

सातारा : शाळा सुरु झाल्याने मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने एकजण शाळेत आला. त्याने थेट शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये प्रवेश करत शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार साताऱ्यातील पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला होता. स्टाफ रूममध्ये कोणीच नसल्याची संधी साधत एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये येऊन त्याने शिक्षिकेच्या पर्समध्ये ठेवलेल्या पॉकेटची चैन उघडत त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी असे साधारण १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. पर्समध्ये दागिने नसल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने पोलिसात धाव घेतली.

Satara Crime
Solapur : जामिनावर सुटताच अनेकांना हेरले; नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे सांगत फसवणूक, सीबीआयने घेतले ताब्यात

अवघ्या दोन तासात ताब्यात 

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो धामणी गावातील मनोज सुरेश घमंडे (वय ४०) असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीवरून धामणी गावात जात तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. 

Satara Crime
Bus Accident : दैव बलवत्तर! काळ होता पण वेळ नव्हती; प्रवाशांनी भरलेली बस विहिरीत कोसळताना थोडक्यात राहिली

जमिनीत पुरलेले दागिने केले हस्तगत 

आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर चोरलेले सर्व दागिने धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितले. त्यानुसार जमिनीत पुरलेले दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com