Erandol Crime : मुलाला दुकानावर बसवून वडील गेले बाहेर; मुलगा मात्र घरी परतलाच नाही, भयानक घटनेने कुटुंब हादरले

Jalgaon Erandol News : वडील गजानन शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवतात. दरम्यान १६ जूनला महाजन यांनी तेजसला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले. रात्री घरी परतले मात्र तेजस आला नसल्याचे दिसून आले
Erandol Crime
Erandol CrimeSaam tv
Published On

जळगाव : शेती करून हार्डवेअरचे दुकान सांभाळणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाला दुकानावर बसण्यास सांगून जळगावी काममिनित्ताने निघून गेले. मुलाने दुकान देखील सांभाळले. मात्र रात्री घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने कुटुंब हादरले असून परिसरात देखील खळबळ उडाली आहे. 

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान तेजस हा रिंगणगाव येथे आई, वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तर त्याचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवतात. दरम्यान १६ जूनला गजानन महाजन यांनी तेजस यास दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. रात्री ते घरी परतले. मात्र तेजस आला नसल्याचे त्यांना दिसून आले. 

Erandol Crime
Beed Crime : मध्यरात्री हनुमानवाडीत थरार; पती- पत्नीला बेदम मारहाण, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार, महिलेजवळील दागिने ओरबडले

रात्रभर शोधाशोध 

त्यांनी घरात विचारणा केली असता तो अद्याप आला नसल्याचे घरच्यांनी सांगितले. यामुळे दुकानावर गेले असता तेथे देखील तो नव्हता. यामुळे शोधाशोध सुरू झाली. तसेच एरंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. मात्र सापडून आला नव्हता.

Erandol Crime
Chandrapur : रेशन तांदळाचा काळाबाजार; पोलिसांची छापा टाकत कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात तपास केला असता मृतदेह तेजसचाच असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबियांना याची माहिती मिळताच जबर धक्का बसला. दरम्यान तेजसची हत्या कोणत्या कारणामुळे आणि कोणी केली? याचा तपास पोलीस करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com