Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv

Chandrapur : रेशन तांदळाचा काळाबाजार; पोलिसांची छापा टाकत कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

Chandrapur News : तांदूळ वडसा येथे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईत १३ टन तांदूळ जप्त केला अर्थात रेशनच्या तांदळाचा सुरु असलेला काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे
Published on

चंद्रपूर : गोरगरिबांना वितरित करण्यात येत असलेल्या रेशनचा तांदूळचा काळाबाजार करत त्याची विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानुसार चंद्रपूरमध्ये स्वस्त धान्य दुकानांतील तांदळाची तस्करी करणारे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी गोदामावर छापा टाकत कारवाई केली असून तांदूळ जप्त करत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रपुरात बिनबागेट परिसरातील ताज एंटरप्रायझेसच्या गोदामावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत १३ टन तांदूळ जप्त केला असून ज्याची किंमत सुमारे ३ लाख ९० हजार रुपये आहे. हा तांदूळ वडसा येथे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात रेशनच्या तांदळाचा सुरु असलेला काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. 

Chandrapur News
Amshya Padvi : एकनाथ शिंदे यांनी लाडकी योजना आणली, पण योजनेमुळे आम्हाला दुःख; शिंदे गटाच्या आमदाराने व्यक्त केली नाराजी

चांगला तांदूळ विक्री करून निकृष्ट तांदळाची खरेदी 

आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये शासकीय योजनेअंतर्गत अल्पदरात तांदूळ मिळतो. हे तांदूळ तस्कर अवैधरित्या चंद्रपूर जिल्ह्यात आणतात. आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला चांगला तांदूळ राईसमिल मालक खुल्या बाजारात विक्री करून त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासनाला पुरवठा करतात. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित केला जातो. 

Chandrapur News
Beed Crime : मध्यरात्री हनुमानवाडीत थरार; पती- पत्नीला बेदम मारहाण, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार, महिलेजवळील दागिने ओरबडले

छापा टाकत कारवाई 

तांदूळ तस्करीच्या पद्धतीमुळे जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पणन अधिकाऱ्यांना एका प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर देखील हे प्रकार सुरु असल्याने पोलिस यंत्रणा तस्करीच्या मागावर होती. यातच माहितीच्या आधारावर पोलिसांनी गोदामावर छापा टाकत कारवाई केली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com