नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली आहे. (nandurbar Helmet compression Use of helmet by both farmer husband and wife)
स्वतःच्या सुरक्षेसाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे; याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरुवातीला जनजागृती संदेश देण्याचे काम सुरू केले आहे. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी ठाणेपाडा रस्त्यावरून एक शेतकरी (Farmer) कुटुंब दुचाकीवरुन जात असताना दोघांनीही हेल्मेट वापरल्याने त्यांना थांबवून त्यांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने अभिनंदन केले. तसेच एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कुटुंब जर हेल्मेट वापरत असेल तर शिकलेल्या सवरलेल्यांनी हेल्मेट का वापरू नये? या शेतकरी कुटुंबाचा आदर्श घ्यावा असा संदेश दिला.
पाचशे रूपये दंड व लायसन्स निलंबित
जिल्ह्यातील शासकीय (Nandurbar News) कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे विना हेल्मेट दूचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट तपासणी मोहिम घेण्यात येत आहे. या नियमाचे पालन न केल्यास मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार दूचाकी चालकास तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींविरुध्द प्रत्येकी 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दूचाकी वाहनांचा वापर करताना हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.