शिक्षकाचा देशी जुगाड; दुचाकीला ट्रॅाली जोडून विद्यार्थीं सोडताय शाळेत

शिक्षकाचा जुगाड; दुचाकीला ट्रॅाली जोडून विद्यार्थीं सोडताय शाळेत
Deshi Jugad
Deshi JugadSaam tv
Published On

जळगाव : एसटी कर्मचारींच्‍या संपात विद्याथ्‍र्यांचे शैक्षणिक होत आहे. स्‍वतःचे खासगी वाहन असलेले शाळेत जावू शकत आहेत. परंतु, ज्‍यांच्‍याकडे वाहन नाही त्‍यांना मुकावे लागते. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात. त्याचे एक सुंदर व स्तुत्य उदाहरण दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) येथील आयटीआय टेहु (ता. पारोळा) येथे कार्यरत शिक्षक एम. व्ही. पाटील उर्फ मोतीलाल पाटील यांच्या रुपाने समोर आले आहे. (jalgaon news teacher creativity Students leave school by attaching trolley to two wheeler)

Deshi Jugad
‘रोहयो’ची मजूरसंख्या सात हजारांवरून अडीच हजारांवर

अगोदर कोरोना (Corona) महामारीमुळे व आता एसटीचा बेमुदत संप (St Strike) यामुळे ग्रामीण भागातुन शहरी भागात शिक्षणासाठी रोज ये जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थी पालकांकडे खाजगी वाहन आहे; ते त्याचा उपयोग करून पाल्यांना शाळेत नियमित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ज्या पालकांकडे खाजगी वाहन नाही त्यांचे पाल्य मात्र बस बंदमुळे शिक्षणापासुन वंचित आहेत. समाजातील काही शिक्षणप्रेमी मात्र अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात. त्याचे एक सुंदर व स्तुत्य उदाहरण दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) येथील (Jalgoan News) आयटीआय टेहु (ता. पारोळा) येथे कार्यरत शिक्षक एम. व्ही. पाटील उर्फ मोतीलाल पाटील यांच्या रुपाने समोर आले आहे. ते दगडीसबगव्हाण ते टेहु रोज ये– जा करतात. असे करतांना वाहना अभावी घरी राहणारे विद्यार्थी बघुन त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले.

तयार केली चार टायरची ट्रॉली

आपल्या कल्पनाशक्तीने १० क्विंटल वजन ओढु शकेल अशी चार टायरची ट्रॉली (Deshi Jugad) बनविली. ती आपल्या मोटर सायकलला जोडणी करण्याची सोय केली. जानेवारी महिन्यापासुन शाळा उघडल्यापासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना बसवुन पारोळा येथे नियमित शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी परत जातांना त्यांना परत नेतात. पाटील सरांच्या या शैक्षणिक सेवेचे व स्तुत्य उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे. दगडीसबगव्हाण हे पारोळा– धरणगाव रस्त्यावर राजवड नजीक रस्त्यापासुन ५ किलो मीटर आतमध्ये आहे. विद्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी पाटील सरांच्या उपक्रमाचा योग्य लाभ घेत आहेत. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत धडपडणारे एम. व्ही. पाटील यांचे कौतुक करून समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देवुन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com