Shahada Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Shahada Heavy Rain : शहादा तालुक्यात तुफान पाऊस; नदी, नाल्यांना पूर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी देखील जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम

Rajesh Sonwane


सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील शहादा तालुक्यात  कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी देखील जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यामुळे गेल्या आठ तासांपासून शहादा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झालेला आहे. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) मंदाना आणि सावखेडा परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आला असून वाहत्या पाण्यामधून आपली वाहने काढत असताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.  

जोरदार वारा असल्या कारणाने अनेक ठिकाणी विजांचे खांब देखील पडले आहेत. यामुळे या परिसरात (Shahada) असलेल्या केळी आणि पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठ तासापासून खंडित असलेल्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आता चांगलेच हैराण झालेले आहेत. सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यात एकूण ३५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT