Taloda Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Nandurbar News : तळोदा तालुक्यात मागील तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः या परिसरात लागवड केलेल्या मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यात तळोदा तालुक्यात तीन दिवसांपासून सलग जोरदार पाऊस सुरु असल्याने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून एन तोडणीच्या वेळेस आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पिक उध्वस्त झाले आहे. यामुळे तीन एकर क्षेत्रावर अडीच लाख खर्च करून उत्पन्न केवळ २५ हजार रुपयांचे निघाले आहे. 

नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तळोद्यासह अक्कक्कुवा तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाल्या असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात तळोदा तालुक्यात मागील तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः या परिसरात लागवड केलेल्या मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.  

ऐन तोडणीच्या वेळेस मुसळधार 

तळोदा तालुक्यातील मोहिदा या गावातील शेतकरी आनंदा चौधरी यांनी आपल्या तीन एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली होती. जवळपास ९० दिवसाचे पीक झाले असून झाडावरील मिरची परिपक्व झाली आहे. आता मिरची तोडणीवर आली असताना ऐन तोडणीच्या वेळेस आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतात असलेले पीक उध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.  

केवळ २५ हजार रुपयांचे उत्पन्न 

शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावर जवळपास अडीच लाख रुपये खर्च केले असून याच्यातून केवळ २५ हजारांचे उत्पन्न निघाले आहे. पुढे कुठलीही उत्पन्नाची अपेक्षा नसून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची पिकाचा पिक विम्यात समावेश नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने मिरची पिकाला देखील पीक विम्यात समावेश करावे; जेणेकरून भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदत होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishna janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीपूर्वी घरी आणा ही 1 वस्तू, सकारात्मक उर्जेसह सुख- समृद्धी नांदेल

WhatsApp Bill Payments: मोठी बातमी! आता Google Pay, PhonePe विसरा; थेट WhatsApp वरूनच भरा वीज-पाण्याचे बिल

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये आज आणखी आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

वयाच्या 30 नंतर महिलांचे वजन का वाढते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Plane Accident News : नवी मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात, पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक झाली अन्...

SCROLL FOR NEXT