Nandurbar Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: हॅकरने बँक खात्यातून तीन लाख रूपये उडवले; पोलिसांनी पैसे मिळून दिले

हॅकरने बँक खात्यातून तीन लाख रूपये उडवले; पोलिसांनी पैसे मिळून दिले

Rajesh Sonwane

नंदुरबार : विज बिल भरण्याचा नावाने तीन लाख रूपये ऑनलाईन पध्दतीने मोबाईल हॅक करून बँक (Bank) खात्यातून लंपास करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बॅंक अधिकारी व पोलिसात तक्रार केल्याने त्यांना संपूर्ण रक्कम (Nandurbar) नंदुरबार पोलिसांनी मिळवून दिली. (Letest Marathi News)

ऑनलाइन किंवा फ्रॉड कॉलने आपली रक्कम बँकेतून उडवली असेल तर स्वस्त न बसता तात्काळ सायबर क्राईमशी (Cyber Crime) संपर्क करून आपले पैसे मिळू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण नवापूर शहरातील विकास शहा यांचे आहे. नवापूर (Navapur) शहरातील स्टॅम्प वेंडर तथा एलआयसी एजंट विकास शहा यांचे इलेक्ट्रिक सिटी नाव असलेल्या नंबरवरून त्यांना फोन आला. तुमचे लाईट बिलाचे अकरा रुपये बाकी आहे ते त्वरित भरा; असे सांगून त्यांच्या अकाउंटमधून दोन लाख 98 हजार रुपये मोबाईल हॅक करून बँकेच्या खात्यामधून पैसे काढून घेतले होते.

काही दिवसात रक्‍कम परत

सदर प्रकार 18 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला होता. तक्रारदार विकास शाह यांनी तात्काळ बँक व पोलिसांना संपर्क केल्याने त्यांचे पैसे काही दिवसातच नंदुरबार सायबर क्राईमने मिळवून दिले. 2 लाख 98 हजार रुपये वॉलेट आणि संबंधित बँक नोडल ऑफिसर यांच्या मदतीने परत मिळवण्यात सायबर सेल नंदुरबार येथील पथकाला यश आले आहे.

ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता

– तुमचा नेट बँकिंग पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन, फोन बँकिंग पिन, कार्ड सीव्हीव्ही नंबर किंवा एक्सपायरी डेट यासारखी कोणतीही गोपनीय माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका.

– सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क किंवा सार्वजनिक संगणक वापरताना पूर्णपणे आर्थिक व्यवहार करू नका.

– तुमच्या ऑनलाइन बँकिंग खात्यांसाठी कठीण पासवर्ड वापरा आणि तो वेळोवेळी बदला.

– ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये लॉग इन करताना नेहमी व्हर्च्युअल की-बोर्ड वापरा.

– ऑनलाइन बँकिंग काम पूर्ण केल्यानंतर तुमच्या वेब ब्राउझरमधून नेहमी ब्राउझिंग डेटा हटवा.

– नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या व्यवहाराच्या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या.

– ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास 155260 वर कॉल करा आणि तत्काळ तक्रार नोंदवा.

– तुम्हाला 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे परत मिळू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

SCROLL FOR NEXT