जळगाव : महानगरी एक्स्प्रेसच्या (बोगी क्रमांक एस-३ मध्ये) शौचालयात अविवाहित तरूणीची प्रसूती झाली. परंतु, नवजात बाळाला फेकून कुमारी मातेने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांच्या सतर्कतेने सदर प्रकार उघडकीस येऊन (Bhusawal) भुसावळ ते पाचोरादरम्यान या मातेचा शोध घेण्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या (Railway Police) जवानांना यश आले. यानंतर माता व बाळ अशा दोघांना जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Live Marathi News)
अप महानगरी एक्स्प्रेसच्या (Railway) बोगी क्रमांक एस-३ मधून १९ वर्षीय अविवाहित माता असलेली तरुणी व तिची आजी खंडवा ते मुंबईदरम्यान (Mumbai) प्रवास करीत होती. तरुणीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिने धावत्या रेल्वेतच पुरुष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. मात्र बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याने त्याची वाच्यता टाळण्यासाठी तरुणीने ते शौचालयात टाकले व सीटवर जाऊन बसली. घडला प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळविला.
कुमारी मातेविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी मातेविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसांत नवजात अर्भक बेवारसरीत्या टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मातेसह अर्भकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली असून, पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकारी तपास करीत आहेत.
नवजात अर्भक ताब्यात
भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर नवजात अर्भकाला ताबा घेण्यात आले. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्या बाळाची आई बेपत्ता असल्याने भुसावळसह जळगाव येथून लोहमार्ग पोलिसांनी गाडीत मातेचा शोध सुरू केला. एका सीटाखाली अविवाहित तरुणी संशयास्पद अवस्थेत लपून असल्याचे आढळल्यावर तिची चौकशी केल्यावर तिने बाळाला जन्म दिल्याची व अनैतिक संबंधातून प्रसूती झाल्याची कबुली दिली. पाचोरा रेल्वेस्थानकावर पहाटे गाडी थांबवून मातेला लोहमार्ग पोलिसांसह जळगावला पुन्हा रवाना करण्यात येऊन उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.