धरणगाव (जळगाव) : ‘‘जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांनी केवळ भाषणबाजी केली. आम्ही बाप बदलत नाहीत, (Shiv Sena) शिवसेना व उद्धव साहेबांना कधीही सोडणार नाही, असे म्हणणारे हे एकनिष्ठ कार्यकर्ते खोक्यांपुढे डगमगले आणि उद्धव साहेबांना सोडून गद्दारीचा घरोबा केला’’ अशा शब्दांत (NCP) राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावरून चौफेर फटकेबाजी केली. (Tajya Batmya)
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा धरणगाव (Dharangaon) शहरात होती. त्यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. देवकर यांनी श्रीमती अंधारे यांच्या सभेला हजेरी लावली. सुरुवातीलाच श्री. देवकर यांनी स्पष्ट केले, की शिवसेनेच्या व्यासपीठावर आम्ही जरा अतिक्रमण केले आहे. पण आम्ही (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचा धर्म पाळून या ठिकाणी हजेरी लावली. कधीही बाप न बदलण्याची भाषा करणाऱ्या आमच्या एकनिष्ठ पालकमंत्र्यांनी पन्नास खोक्यांसाठी आपल्या जबानीला बट्टा लावला, ही जळगाव ग्रामीण मतदार संघातील मतदारांशी घोर प्रतारणा आहे.
मंत्रिपद असूनही विकासाची बोंबाबोंब
मंत्रिपद असून देखील विकासाच्या नावाने जिल्ह्यात बोंबाबोंब आहे. २००९ च्या निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यात धरणगावचा उड्डाणपूल अवघ्या दोन वर्षात करण्याची घोषणा केली. त्यावेळी उड्डाणपुल झाला तर मी देवकर आप्पांचा जाहीर सत्कार करेल, अशी भाषा करत होते. मला दोन वर्षे मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्याच कालावधीत धरणगावचा उड्डाणपूल उभा करून दाखवला. त्याचेही श्रेय घ्यायला यांनी मागेपुढे पाहिले नाही. पण जनता आता दुधखुळी राहिली नाही.’
तर एक लाखाचे बक्षीस देईन
‘माझ्या मंत्रिपदाच्या काळात गाढोदा, दहिदुल्याचा पूल उभा केला, आताच्या पालकमंत्र्यांनी एक तरी असे काम केल्याचे उदाहरण दाखवावे, त्यांना माझ्याकडून मी एक लाख रुपये बक्षीस देईल, अशा शब्दांत श्री देवकर यांनी पालकमंत्र्यांचा समाचार घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.