Gharkul Yojana Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Gharkul Scam: खोट्या कागदपत्रांद्वारे घरकुलाचा निधी हडपला; खरा लाभार्थी अनभिज्ञ

खोट्या कागदपत्रांद्वारे घरकुलाचा निधी हडपला; खरा लाभार्थी अनभिज्ञ

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : उमराणी (ता. धडगाव) येथील रहिवासी मात्र सध्या मध्य प्रदेशात वास्तव्यास असलेल्या रमेश सोन्या ठाकरे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे करून (Gharkul Yojana) घरकुलांचा निधी दोनदा हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या ठाकरे कुटुंबातील कुणालाही घरकुले मिळालेली नाहीत. मात्र त्यांनी (Nandurbar News) अनुदान घेतल्याचे सांगत गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी यांनी त्यांना तुमच्याविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस काढली आहे. (Breaking Marathi News)

सदर प्रकरणाचा ऊहापोह होताच अंगलट येऊ नये म्हणून धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी यांनी रमेश सोन्या ठाकरेसह सोन्या रेवला ठाकरे, दिलीप सोन्या वसावे, राज्या दाज्या ठाकरे, अशोक दाज्या ठाकरे, पिंट्या सोन्या ठाकरे व दाज्या रेवल्या ठाकरे या सात जणांना ४ नोव्हेंबरला नोटीस बजावली.

काहीच नाही, तरीही खाते

ज्याच्या नावाने निधी काढला आहे त्या रमेश ठाकरेकडे आधारकार्ड अन् रेशनकार्डही नाही. मात्र त्याच्या नावे खोटे कागदपत्रे तयार करून (Bank) बॅंकेतही खोटे खाते उघडून रक्कम लाटण्याचा उद्योग नेमका कुणाच्या संमतीने झाला, ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणेतील कोण यात सहभागी आहे याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांनी केली आहे.

दोनदा रक्कम केली वर्ग

रमेश ठाकरे यांच्या खाते क्रमांक ३८४७६९५८९४ मध्ये २ जून २०२१ ला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गवंडी प्रशिक्षण योजनेत एक लाख २० हजार रुपये शासकीय खात्यावर जमा झाले आहेत. त्यातील २० हजार एटीएमद्वारे काढण्यात आले. उर्वरित एक लाख ११० रुपये त्या खात्यावरून ०५१२०२६२५६६ या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत पुन्हा या खात्यावर पहिला हप्ता १५ हजार व दुसरा हप्ता ४५ हजार असे ६० हजार रुपये बोगस खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीचा नावे दोन वेळेस लाभ घेऊन निधी लाटला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT