Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : माजी खासदार हिना गावित आता विधानसभेसाठी उतरणार रिंगणात; काँग्रेसच्या पाडवींची डोकेदुखी वाढणार

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. हिना गावित या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या होत्या. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित या देखील आता अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली असल्याचे बोललं जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत (Nandurbar News) नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. हिना गावित या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या होत्या. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली असून प्रचाराला देखील सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत उभ्या राहून लोकसभा निवडणुकीतील प्रभावाच्या वचपा काढण्याची त्यांची तयारी आहे. मात्र पक्ष कोणाला तिकीट देते यावर पुढील गणित अवलंबून आहे. 

डॉ. हीना गावित (Hina Gavit) यांच्या काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. डॉ. हिना गावित यांच्यामुळे के. सी. पाडवी (K C Padvi) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अक्कलकुवा- आक्रनी मतदारसंघात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भाजपाचे माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून देखील प्रचार केला जात असल्याने पाडवी आणि शिंदे गट यांच्यासमोर समस्यांच्या डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे पक्ष आता महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?

Maharashtra Election: पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Maharashtra Election : शेकापचे ५ उमेदवार जाहीर, 'मविआ'बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Maharashtra Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं? सकाळ-CSDCचं सर्वेक्षण वाचा क्लिकवर

Winter Places: थंडगार हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांचे सौंदर्य फुलतं, नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT