पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांची सुरु आहे. अजूनही जागा वाटपाचा तिढा अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. दरम्यान महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटली आहे. भाजपने त्या ठिकाणी शंकर पांडुरंग जगताप यांना उमेदवार देखील घोषित केल्यामुळे आता महायुतीत बंडखोरीला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत पाहण्यास मिळणार आहे. मात्र अनेक ठिकाणी मित्र पक्षांकडून बंडखोरी करत आव्हान दिले जाणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्याचे संकेत आहेत. अजित पवार गटाचे नगरसेवक नाना काटे हे देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. नाना काटे हे चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून ते अगदी काही मिनिटांनंतर मुंबई येथे (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न
चिंचवड विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी; यासाठी नाना काटे प्रयत्न करत आहेत. नाना काटे यांच्यासोबत अजित पवार गटाचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी देखील आज शरद पवार यांना भेटणार आहेत. २०२३ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात थांबले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना कडव आव्हान दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.