Nandurbar Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Taloda News : बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; तळोदा तालुक्यात तीन लाखांचे बोगस खत जप्त

Nandurbar Taloda News : बोगस खतांची निर्मिती करून त्याची शेतकऱ्यांना विक्री करत फसवणूक करण्यात येत असल्याचे तळोदा तालुक्यात समोर आले आहे, या प्रकरणी बोगस कंपनी सह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

तळोदा (नंदुरबार) : पिकांची वाढ करण्यासाठी शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असतो. मात्र यात बोगस खतांची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यात कृषी विभागाच्या पथकाकडून शिर्वे शिवारातून तीन लाख रुपये किमतीचे बोगस खत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीसह कंपनीविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांमधून रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असते. मात्र अनेक ठिकाणी बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाकडून या प्रकरणी कारवाई केली जात असताना देखील बोगस निर्मितीचे रॅकेट अनेकदा समोर आले आहे. अशाच प्रकारे नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात कृषी विभागाकडून बोगस खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  

१५० बोगस खतांच्या गोण्या 

तळोदा तालुक्यातील शिर्वे शिवारात एकजण बोगस खते विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता सायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये खतांच्या गोण्या आढळून आल्या. पथकाने खताची तपासणी केली असता संबंधित खत हे बोगस असल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी एकुण १५० गोण्या खत जप्त करण्यात आले. त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. 

बोगस खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

दरम्यान सायसिंग याच्याकडे खत विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानुसार सायसिंग राऊत व संबंधित कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम व खत नियंत्रण आदेश नुसार तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथक प्रमुख किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार स्वप्निल शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नीलिमा वसावे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT