Nandurbar Collector Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : जिल्हाधिकाऱ्यांचा ७ किमी पायी प्रवास; कालापाणी ते केलापानी रस्त्याचे काम करण्याबाबत आदेश

Nandurbar News : रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यात आता पाणी समस्या जाणवू लागल्याने खडतर रस्त्यातून पाणी आणावे लागत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक समस्या आहेत. प्रामुख्याने नागरिकांना येण्याजाण्यासाठी देखील रस्ता नसल्याचे चित्र आहे. दरम्यान या खडतर रस्त्यावरून रुग्णालयात उपचार करण्यासाठी जावे लागते. तसेच खोल दऱ्यांमधून डोक्यावर पाणी आणावे लागते. या सर्व प्रकाराबाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दखल घेत कालापानी ते केलापानी असा सात किलोमीटर पायी प्रवास करत गाव गाठले व येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असल्याने तोरणमाळ नजीकच्या केलापाणी या गावाला रस्ता मंजुर असून तयार न झाल्याने या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असते. रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यात आता पाणी समस्या जाणवू लागल्याने खडतर रस्त्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच आरोग्याच्या समस्या देखील भेडसावत असतात.

साम टीव्हीच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर

थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ नजीक असलेल्या केलापाणी गावात जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाही या विषयावर साम टीव्हीने बातमी प्रसारित केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी मिताली सेठी ऍक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी कालापाणी ते केलापानी असे तब्बल ७ किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करत केलापाणी गावात पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. 

रस्त्याचे काम करण्याचे आदेश 
केलापाणी गावात काही दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेला करीत प्रस्तुती करावी लागली होती. त्यात तिचा बालकाचा मृत्यू झाला होता. तसेच येथील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर पायपीट करत २०० फूट खोलदरीतून पाणी आणावे लागत असल्याची बातमी देखील साम टीव्हीने दिली होती. हि सर्व परिस्थिती पाहता वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पायपीट करत जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात रस्त्याचे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. केलापाणी गावात पाणी, आरोग्य, रस्ते आणि लवकरच अंगणवाडी बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

SCROLL FOR NEXT