Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

नवीन डांबरीकरण केलेला महामार्ग खचतोय; निकृष्‍ट कामाचा दर्जा

नवीन डांबरीकरण केलेला महामार्ग खचतोय; निकृष्‍ट कामाचा दर्जा

दिनू गावित

नंदुरबार : धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. नवापुर (Navapur) तालुक्यातील कोंडाईबारी घाटात नवीन डांबरीकरणाचा रस्ता जमिनीत दाबला जात असल्याने सदर रस्त्यावर ट्रकच्या टायरांनी चाऱ्या पडत असल्याने या चाऱ्यांमध्ये कार, मोटर सायकल, रिक्षा आधी लहान (Nandurbar News) वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घाट रस्त्यात उतारावर वेगाने येणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना या चाऱ्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघात (Accident) घडत आहे; त्यामुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून केली जात आहे. यामुळे महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. (nandurbar news dhule surat highway Poor quality of work)

कोंडाईबारी ते विसरवाडी दरम्यान रस्त्यावरील अनेक भागात ही समस्या जाणवत असल्याने यावर ठोस उपाय योजना करून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात रस्ता खचलेल्या जागी वाहने अनियंत्रित होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सदर खचलेला रस्ता वाहनचालकांना लक्षात येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.

कामाचा दर्जा खालावलेला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चौपदरीकरणाच्या कामात सुरुवातीपासूनच अनियमितता असल्याने कामाचा दर्जा खालावलेला आहे. २०१४ साली उद्घाटनानंतर गुजरात (Gujrat) राज्यातील एका कंपनीने काम सुरू केले होते. मात्र सदर कंपनी डबघाईला गेल्याचे सांगत अर्धवट काम झाले होते. आता पुन्हा जे.एम. म्हात्रे कंपनीला ठेका मिळाल्याने कामाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असतानाच खराब अवस्थेत दिसून येत आहे.

पावसाळ्यात महामार्ग पडू शकतो बंद

अवजड वाहनांच्या टायराने नवीन डांबरीकरणाचा रस्ता खचत असल्याने चौपदरीकरण कामाचे ठेकेदार जे. एम. म्हात्रे कंपनीच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्त्यावरील अनेक ठिकाणी कामाचा दर्जा खालावलेला दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने व्हावे; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी विसरवाडी पानबारा तसेच नवापूर येथील मोठ्या नद्यांवरील पूलाचे काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात महामार्ग बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज आणि उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द

महायुती सरकारला मोठा धक्का! सहकार मंत्र्यांवर आरबीआयची थेट कारवाई; संचालकपदावरून उचलबांगडी

Belly Fat Loss : पोटाचा घेर पटकन होईल कमी! सकाळी प्या 'हे' ३ मॅजिकल ड्रिंक्स; आठवडाभरात दिसेल फरक

फक्त १५० रुपयांत बीडहून पुण्यात टच, पाहा कुठल्या स्थानकांवर थांबणार ट्रेन? जाणून घ्या बुकींगची वेळ

ब्रश करूनही दात पिवळे अन् कमकुवत होतात? तुमच्या 'या' 5 नेहमीच्या चुका आहेत कारणीभूत

SCROLL FOR NEXT