ब्रश करूनही दात पिवळे अन् कमकुवत होतात? तुमच्या 'या' 5 नेहमीच्या चुका आहेत कारणीभूत

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी जशी आपण आरोग्याची काळजी घेतो, तशीच दातांची काळजी घेणेही महत्वाचे आहे.

Teeth Whitening | pintrest

रोजच्या सवयींचा दातावर परिणाम

मात्र, आपल्या दैनंदिन जीवनातील काही लहान-सहान सवयींमुळे दातांचे आरोग्य हळूहळू बिघडत जाते आणि दातांच्या समस्या वाढू लागतात. आपण दात कसे घासतो आणि काय खातो-पितो, याचा थेट परिणाम आपल्या दातांवर होत असतो.

Teeth Whitening | PINTREST

खूप जोराने दात घासणे

अनेकांचा असा समज असतो की जेवढ्या जोराने दात घासले, तेवढे दात अधिक स्वच्छ आणि चकाकणारे होतात. मात्र, ही एक अत्यंत चुकीची सवय आहे, ज्यामुळे दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Teeth Whitening Tips

कडक ब्रिसल्सचा टूथब्रश वापरणे

कडक ब्रिसल्सअसलेल्या टूथब्रशने वारंवार दात घासल्यामुळे दातांवरील संरक्षणात्मक थर म्हणजेच 'इनॅमल' निघून जाऊ शकतो, ज्यामुळे दात संवेदनशील होतात.

Teeth Whitening Tips

जास्त प्रमाणात साखरेचे आणि गोड पदार्थांचे सेवन

अतिगोड पदार्थ आणि साखरेचे वारंवार सेवन केल्यामुळे दातांवर जंतू आणि प्लाक जमा होतो, ज्यामुळे दातांच्या समस्या वेगाने वाढतात.

Teeth Cleaning Tips

आम्लयुक्त पेय प्यायल्यानंतर तोंड न धुणे

सोडा तसेच आम्ल पेय प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ न धुण्याची सवय दातांच्या इनॅमलला कमकुवत करते. आम्लयुक्त पेय प्यायल्यानंतर त्वरित तोंड पाण्याने धुणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Teeth Whitening | PINTREST

अपुरे पाणी पिणे आणि कॉफी-मद्यपानाचे सेवन

लाळ ही तोंडाची नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे, जी दातांचे जंतूंपासून रक्षण करते. मात्र, अपुरे पाणी पिणे, कॉफी आणि मद्यपानाचे वारंवार सेवन यामुळे तोंडातील लाळेचे प्रमाण कमी होते आणि दातांच्या समस्या बळावतात.

Oral Health Check | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

Men’s Health Checkup After 30
येथे क्लिक करा...