Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

Manasvi Choudhary

शरीर

वयोमानानुसार महिला व पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. साधारण वयाची 30 शी ओलांडली की शरीरात अनेक बदल होताना दिसतात.

Men’s Health Checkup After 30

हेल्थ चेकअप

नियमित हेल्थ चेकअपमुळे शरीरात काही आरोग्यविषयक समस्या असतील त्या समजतात यासाठी पुरूषांनी कोणत्या 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्टचा विचार करावा, ते जाणून घ्या.

Men’s Health Checkup After 30 | Saam Tv

ब्लड शुगर टेस्ट

बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे आजकाल तरुण वयातच मधुमेहाची उद्भवते यासाठी रक्तातील साखरेची पातळी नेमकी किती आहे हे तपासण्यासाठी फास्टिंग शुगर टेस्ट नक्की करा

Men’s Health Checkup After 30 | pinterest

ब्लड प्रेशर तपासणी

उच्च रक्तदाब शरीरात वाढलं की त्याची लक्षणे सहसा लवकर दिसून येत नाही. ३० शी नंतर नियमितपणे बीपी मोजण्याची सवय ठेवा, जेणेकरून हृदयावरील ताण आणि अटॅकचा धोका टाळता येईल.

Blood Pressure Check | pinterest

कोलेस्ट्रॉल टेस्ट

शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट करा. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचत आहे का हे समजते.

Lipid Profile / Cholesterol Test | yandex

रक्त तपासणी

शरीरात रक्ताचे प्रमाण पांढऱ्या पेशींची स्थिती जाणून घेण्यासाठी सीबीसी टेस्ट करणे गरजेचे आहे. यामुळे अशक्तपणा किंवा शरीरातील संसर्ग समजतेतो.

(Complete Blood Count - CBC) | GOOGLE

यकृत आणि मूत्रपिंड तपासणी

तुम्ही जर मद्यपान करत असाल तर त्याचा थेट परिणाम लिव्हर आणि किडनीवर होतो. हे दोन्ही महत्त्वाचे अवयव निरोगी आहेत की नाही, हे पाहण्यासाठी एलएफटी आणि केएफटी टेस्ट करावी.

Liver & Kidney Function Test - LFT & KFT | pinterest

व्हिटॅमिन डी आणि बी-१२ टेस्ट

ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून काम करणाऱ्या पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डी आणि बी-१२ ची कमतरता मोठ्या जाणवते. यामुळे हाडांचे दुखणे, थकवा आणि केस गळणे यांसारख्या समस्या होतात. ही कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि बी-१२ टेस्ट करा.

Vitamin D & B12 Test

थायरॉईड तपासणी

थायरॉईड हा फक्त महिलांचा होतो असं मानलं जातं पण आता पुरुषांमध्येही वजनात अचानक बदल होणे किंवा थकवा जाणवण्यामागे थायरॉईडचे कारण असू शकते यासाठी थॉयराईड तपासणी करा.

Thyroid Test - TSH

NEXT: Latest New Mangalsutra: काळ्या मण्यांचा 'हा' लूक होतोय प्रचंड व्हायरल, पाहा मंगळसूत्राचे ६ सर्वात सुंदर डिझाईन्स

modern mangalsutra designs
येथे क्लिक करा...