Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात २ फेब्रुवारीला राजकीय भूकंप; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा दावा

Nandurbar News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार करण्यात येत आहे. काही जाहीर कार्यक्रम व पक्षाचे कार्यक्रम देखील नियोजित आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याचा दौऱ्यावर पहिल्यांदा येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा; (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी केला आहे.  (Live Marathi News)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होत आहे. याचे उद्घटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येत असून ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर देखील जाणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार करण्यात येत आहे. काही जाहीर कार्यक्रम व पक्षाचे कार्यक्रम देखील नियोजित आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार यांच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय पक्षातील मोठ्या पदधिकारी यांचा प्रवेश सोहळा आणि राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. दुपारी २ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार जिल्ह्यात राहणार आहेत. या जिल्ह्यातून ते पक्षवाढीसाठी कुणाला सोबत घेतात आणि काय राजकीय खेळी करतात; याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT