Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Akrani News : मरणयातना संपेना; सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेत, रुग्णालयात नेण्यासाठी बांबूच्या झोळीतून ३ किमीचा जीवघेणा संघर्ष

Nandurbar News : रुग्णाला नेण्यासाठी ऍम्बुलन्स पोहचू शकत नाही. यामुळे झोळी करून रुग्णाला त्यात टाकून खांद्यावर नेण्याची वेळ येत असते. असे अनेक प्रसंग या आदिवासी भागात पाहण्यास मिळाले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरणयातना संपत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णालयात पोहोचण्यासाठी बांबूच्या झोळीतून ३ किलोमीटरपर्यंतचा जीवघेणा संघर्ष करावा लागल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात घडली आहे. नातेवाईकांच्या खांद्यावर रुग्णाचे प्राण असलेला हा प्रसंग पाहून अनेकांचे मन हेलावले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रस्ता नसल्याने वाहने पाड्यांपर्यंत पोहचणे कठीणच आहे. यात पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिक बिकट समस्या या आदिवासी बांधवाना येत असते. कारण रुग्णालयाचा विषय आल्यास रुग्णाला नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स पोहचू शकत नाही. यामुळे झोळी करून रुग्णाला त्यात टाकून खांद्यावर नेण्याची वेळ येत असते. असे अनेक प्रसंग या आदिवासी भागात पाहण्यास मिळाले असून पुन्हा एकदा हे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

कमरेइतक्या पाण्यातून काढली वाट 
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात मोजरा पाटील पाडा येथील शिवलाल वळवी (वय ३४) या आदिवासी बांधवाला विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. परंतु मोजरा नदीला पूल तसेच रस्ता नसल्यामुळे शिवलाल यांना रुग्णालयात पोहोचवणे एक मोठे आव्हान बनले. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी बांबूच्या झोळीत घालून, कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत सुमारे ३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला. या जीवघेण्या प्रवासात नातेवाईकांना प्रचंड हाल सोसावे लागले.

सुदैवाने वाचले रुग्णाचे प्राण 

अथक प्रयत्नांनंतर सर्पदंश झालेल्या शिवलाल वळवी यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने रुग्णालयात वेळेवर पोहोचल्यामुळे आणि योग्य उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था आणि मूलभूत सोयी- सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT