Nandurbar Congress Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोर्चे बांधणी; नंदुरबार जिल्ह्यात इच्छुकांची मोठी गर्दी

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा या मतदार संघात पराभव झाला.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या नंदुरबार जिल्ह्यात उमेदवारांची चाचणी केली जात आहे. या (Nandurbar) मतदार संघात नऊ जणांनी दावा सांगितला असला, तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्यासाठी सर्वच (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र असून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वजण मेहनत करणार आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. मात्र २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा या मतदार संघात पराभव झाला. त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला आणि आतापर्यंत या ठिकाणी (BJP) भाजपच्या हातात आहे. या मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनी कडवी झुंज दिली होती. २०१९ च्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे या मतदार संघात भाजप उमेदवारांचा मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर आता होऊ घातलेल्या २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात?

त्यासोबत या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारांची मोठी गर्दी असल्याने पक्षाकडून उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहनेही महत्वाचे आहे. मात्र मागच्या वेळेस भाजप उमेदवारांचे मताधिक्य कमी करणारे उमेदवार के. सी. पाडवी यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळू शकते अशी शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने वन बूथ ५० युथ ही संकल्पना राबविण्यात आली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांसोबत चर्चा करून उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल; अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी.  पाडवी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

SCROLL FOR NEXT