Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : दहा हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह, शिपाई ताब्यात

Nandurbar News : सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी; म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करू देण्यासाठी २१ हजाराच्या (Bribe) लाचेची मागणी केली. यातील दहा हजार रुपये स्वीकारताना (Sarangkheda) सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (Breaking Marathi News)

पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व (Nandurbar) चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नवे आहेत. सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी; म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला. त्याबदल्यात त्याच्याकडे २१ हजाराची लाचेची मागणी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस शिपाई गणेश गावित यांनी केली. त्यानंतर दहा हजारात तडजोड झाली. याप्रकरणी व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत विभागाकडे (ACB) याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सापळा रचून पकडले 

तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सारंगखेडा येथे सापळा रचत ठरल्यानुसार दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांचा पथकाने ही कारवाई केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT