Nandurbar Politics News:  Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदुरबारमध्ये काँग्रेसला धक्का; जिल्हा परिषद सभापती रतन पाडवींचा अजित पवार गटात प्रवेश

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Nandurbar Politics News:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून जाहीर सभा, नेत्यांचे दौरे वाढू लागले आहेत. अशातच नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress) आणि माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर के सी पाडवी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती रतन पाडवी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात के सी पाडवी यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या रतन पाडवी यांनी पक्षाला रामराम ठोकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ते सामील झाले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रतन पाडवी यांच्यासोबतच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही ही राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाचे ५०० कार्यकर्ते मनसेत..

काँग्रेस पाठोपाठ मुंबईमध्ये ठाकरे गटाला मनसेने मोठा धक्का दिला आहे. सिल्वासा येथील ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT