Govandi News: मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; गोवंडीत अनधिकृतपणे विक्री केले जाणारे मांस जप्त

Mumbai Govandi News : मुंबईतील गोवंडीत मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाने गोवंडीत अनधिकृतपणे विक्री केले जाणारे ४ हजार किलो मांस जप्त केले आहे.
BMC News
BMC Newssaam tv
Published On

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai Govandi Latest News:

मुंबईतील गोवंडीत महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. पालिकेच्या बाजार विभागाने गोवंडीत अनधिकृतपणे विक्री केले जाणारे ४ हजार किलो मांस जप्त केले आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलमान्वये कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाकडून गोवंडीच्या पश्चिम येथील केना मार्केटबाहेर धडक मोहिमेअंतर्गत सुमारे चार हजार किलोहून अधिक मांस जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीदरम्यान अतिक्रमण निष्कासन कार्यवाही आणि दंडात्मक कार्यवाहीदेखील करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BMC News
BEST BMC News: 'बेस्ट'बाबत BMC चा मोठा निर्णय, आर्थिक स्थिती सुधारणार का? जाणून घ्या

महापालिकेकडून नागरिकांना मोठं आवाहन

तसेच पालिकेने अनधिकृतपणे व्यवसायात वापरण्यात येणारी साधन सामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. नागरिकांनी उघड्यावरील पदार्थ खरेदी करू नये अथवा सेवन करू नये, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

मुंबईतील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. अनधिकृतपणे मांसविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कार्यवाही मोहीम राबवण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश रसाळ यांना दिल्या होत्या.

बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही करत लागोपाठ दोन दिवस धडक मोहीम राबवतानाच ४ हजार किलोंहून अधिक मांस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

BMC News
BMC Budget News : मुंबई महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर

शेळ्यामेढ्यांचे मांस जप्त

मुंबई महापालिकेच्या अधिनियम १८८८ मधील कलम ४१० (१) अन्वये अंतर्गत गोवंडी पश्चिम परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे २ हजार ८०० किलो बकऱ्यांचे मांस जप्त करण्यात आलं आहे.

या कारवाईत शेळ्यामेढ्यांचे १ हजार ४६० किलो मांस जप्त करण्यात आलं. पालिकेकडून रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासन कार्यवाही करण्यात आली. तसेच देवनार पोलीस ठाणे येथे तीन व्यक्तींविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com