Balasaheb Thorat Saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : महायुतीचे भ्रष्ट्र सरकार घालवणे हा महाविकास आघाडीचा उद्देश आहे; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत काँग्रेसकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्यात आली होती. ही बंडखोरी मागे घेण्यासाठी बाळासाहेब थोरात नंदुरबारमध्ये आले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात उमेदवारांची महाविकास आघाडींकडे संख्या जास्त राहिल्याने कमी जास्त प्रमाणात नाराजी होती. मात्र सर्व वाद मिटवून बंडाना थंड करुन आम्ही पुढ जात आहोत. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या १८० जागा मिळाल्यातर आश्चर्य वाटायला नको. महायुतीचे भ्रष्ट्र सरकार घालवणे हा महाविकास आघाडीचा उद्देश आहे; असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत काँग्रेसकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्यात आली होती. ही बंडखोरी मागे घेण्यासाठी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) नंदुरबारमध्ये आले होते. काँग्रेसच्या अपक्ष उमेदवारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करत अर्ज मागे घेण्यात थोरात याना यश मिळाले; यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. 

जरांगे पाटलांचा निर्णय योग्य 

मनोज जरांगे पाटील (manoj Jarange Patil) यांच्या निर्णयाबाबत बोलताना थोरात म्हणाले, कि त्यांच्या निर्णयाचा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्यांनी विचारअंती निर्णय घेतला आहे. राजकारणामध्ये ते काम करत नसून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. तर रश्मी शुक्लांचा बाबतीत योग्य निर्णय झाला असल्याचे सांगत काही स्वायत्त संस्था त्यांचा वापर २०१४ पासून राजकारणासाठी होतांना दिसत आहे. असा निर्णय झाला असेल तर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला, असे आम्ही म्हणू. 

नाराजी दुर करुन आम्ही पुढे जात आहोत

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा- तळोदा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीला रोखण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आज काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेत सुहास नाईक यांच्या घरी जात त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच सुहास नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार असल्याचे घोषणा केली.  त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT