Sangli News : सांगली जिल्ह्यात बंडखोरी कायम; महायुती, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार

Sangli News : सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे.
Saam tv
Sangli NewsSangli News
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. सांगलीमध्ये काँग्रेसची एका ठिकाणी बंडखोरी झाली आहे. तर भाजपची दोन ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या बंडखोरीचे आव्हान या दोन्ही पक्षांना असणार आहे.

सांगली (Sangli) विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून बंडखोरी झाली आहे. वसंतदादा घराण्याच्या सून आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी बंड पुकारला आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असून उद्या त्यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. काँग्रेसकडून जयश्री पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवणारच, अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे. अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असला तरी जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला आहे. या ठिकाणी (Congress) काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी जयश्री पाटलांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे.

Saam tv
Hingoli Crime : बंद घरे, दुकाने फोडली; दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार

गोपीचंद पराडकरांसाठी अडचण 
त्यानुसार जत विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून स्थानिक भाजप नेत्यांनी एकत्रित येत भाजपचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्थानिक नेत्यांसह नाराज तमनगवडा पाटील यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निवडणूक लढढविण्यावर ठाम असून गोपीचंद पडळकर यांना अडचणीचं ठरणार आहे.

Saam tv
Wardha News : गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकचा पाठलाग; पोलिसांच्या वाहनांना धडक, ट्रकने पेट घेतल्याने १५ जनावर जळून खाक

सांगली विधानसभेतही बंडखोरी 
त्याचप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले शिवाजी डोंगरे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवाजी डोंगरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला करण्यात आला. मात्र शिवाजी डोंगरे हे माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com