Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : शरद पवार, रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज; भाजप महामंत्री विजय चौधरी यांचे वक्‍तव्‍य

शरद पवार, रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज; भाजप महामंत्री विजय चौधरी यांचे वक्‍तव्‍य

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : मागील काळातील शरद पवार यांचे राजकारण आपण बघितले, तर ते फक्त फोडाफोडीचे राजकारण (NCP) त्यांनी महाराष्ट्रात केले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी परिवारांमध्ये भांडण लावण्याचे काम (Sharad Pawar) शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हे शरद पवार यांना सोडून जात आहेत. रोहित पवार (rohit Pawar) यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे; असे वक्‍तव्‍य भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे. (Live Marathi News)

अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलं तापलं आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी केलेला वक्तव्याला भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बंड हा राष्‍ट्रवादीचा अंतर्गत विषय

अजित पवारांसारखा कुशल नेता शरद पवार यांच्यापासून लांब जात आहे. कुठे ना कुठे त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात होता. अजित पवारांविरोधात (Nandurbar News) कारस्थान रचले जात होते. त्यामुळे त्यांनी हा बंड केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा अंतर्गत विषय असून यात भाजपचा कोणताही संबंध नाही; असे वक्तव्य (BJP) भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT