Egg Price Hike Saam tv
महाराष्ट्र

Egg Price Hike : थंडीत महागली अंडी! आता डझनाला ८० ते ८५ रुपये मोजावे लागणार

Nandurbar News : मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमान ५ अंशापेक्षा खाली गेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील तापमान १० अंशाच्या खाली घसरल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. थंडी वाढल्याने अंड्यांच्या भावात देखील तेजी आली आहे. यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. साधारणपणे एका ट्रे (३० अंडी) मागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता ८० ते ८५ रुपये मोजावे लागणार आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमान ५ अंशापेक्षा खाली गेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील तापमान १० अंशाच्या खाली घसरल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर वाढले आहेत. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात ख्रिसमस व नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रणाम अधिक असते. यामुळे अंड्यांची मागणी देखील वाढत असते. 

होलसेल दरात २० रुपयांची वाढ 

थंडीत अंड्यांची मागणी वाढत असते. त्यानुसार आता देखील अंड्यांची मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या पाटीला २०० रुपयांचा भाव झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी १८० रुपये दराने मिळणारी अंड्याची पाटी आता २०० रुपयांना मिळत आहे. यामुळे किरकोळ भावात देखील वाढ झाली असून किरकोळ दरात ५ रुपयांना मिळणारे अंडे आता ७ रुपयांना मिळत आहे. 

गावरान अंडयांच्या दरातही वाढ 

अनेकजण बॉयलर कोंबळीचे अंडी घेण्यापेक्षा गावरान अंडी घेणे पसंत करत असतात. यामुळे या अंड्यांची मागणी देखील वाढत असते. सध्या हिवाळा सुरु असल्याने या दरम्यान गावरान अंड्याची देखील मोठी मागणी असते. सध्या गावरान अंडी देखील तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहेत. १० रुपयांना मिळणारी गावराणी अंडी आता १२ ते १५ रुपये दराने मिळत आहे.

अंडा भुर्जी महागणार 

थंडीत अंडी खाणे फायदेशीर असल्यामुळे अंड्यांची मोठी मागणी असते. अंड्यांची मागणी वाढल्यामुळे आवक घटल्याने दर तेजीत आले आहेत. अर्थात अंड्याचे दर वाढल्याने आता अंडा भुर्जीचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात अंडा गाडीवर भुर्जी खाणाऱ्यांची गर्दी असते. मात्र या अंडी खाणाऱ्यांना आता जाडा पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT