Murbad Crime : पोलीस पत्नीचे दागिने लांबवीले; बसमध्ये चढताना १९ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Murbad News : मुरबाडहून सरळगाव उंबरपाडा येथे जाण्यासाठी त्या किसळ बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढतेवेळी प्रवाशांची खुप गर्दी होती. मुलाला सोबत घेऊन सारिका घुडे या बसमध्ये चढल्या
Murbad Police Station
Murbad Police StationSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मुरबाड : मुरबाड शहरातील अनेक दुकाने फोडीच्या तसेच चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता पोलीस पत्नीचेच दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बसमध्ये चढत असताना पर्समध्ये ठेवलेले तब्बल १९ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे खळबळ माजली असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुरबाडमधील सरळगाव उंबरपाडा येथील संजय हिरू घुडे हे मुरबाड ट्राफिकमध्ये पोलीस हवालदार आहेत. त्यांची पत्नी सारिका या आपले नातेवाईक आकाश संतोष घुडे याच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी उंबरपाडा येथे कल्याणहून मुरबाडला आल्या. मुरबाडहून सरळगाव उंबरपाडा येथे जाण्यासाठी त्या किसळ बसमध्ये चढल्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. बसमध्ये चढतेवेळी प्रवाशांची खुप गर्दी होती. 

Murbad Police Station
Lookback 2024 : लग्नाच्या अमाप खर्चाला फाटा; वर्षभरात पुण्यात साडे पाच हजार जोडप्यांचे कोर्ट मॅरेज

आपल्या मुलाला सोबत घेऊन सारिका घुडे या बसमध्ये चढल्या. बसमध्ये बसल्यावर त्यांना पर्सचे वजन कमी झाल्याचे लक्षात आले. बसमध्ये गर्दीत चैन स्नँचींगच्या घटना घडतात. म्हणून त्यांनी दागिने अंगावर न घालता पर्समध्ये ठेवले होते. पर्समध्ये पाहिले असता दागिने नव्हते. पर्समध्ये साधारण १९ तोळे सोन्याचे दागिने काढून ठेवलेले होते. 

Murbad Police Station
Jalna Politics : जालन्यात पालकमंत्री म्हणून अतुल सावे पुन्हा नको; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध

बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सारिका घुडे यांचे सुमारे एकोणीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यांनी लागलीच याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत. दरम्यान मुरबाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनेनंतर महिलांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com