Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: नागन नदीवरील पर्यायी पूल दोनच दिवसात गेला वाहून; दहा गावांना फटका

नागन नदीवरील पर्यायी पूल दोनच दिवसात गेला वाहून; दहा गावांना फटका

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. परंतु, मातीचा पूल पहिल्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना दळणवळणासाठी (Nandurbar News) मोठी गैरसोय निर्माण झाली होती. (Nandurbar News Heavy Rain)

नागन नदीवरील पर्यायी पुलाबाबत साम टीव्हीने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला जागे केले होते. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या पाहणीनंतर पुन्हा या ठिकाणी पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचा पूल दोनच दिवसात पुन्हा वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे (Student) विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दहा गावांची गैरसोय

मोठ्या पुलाचे काम ठेकेदाराने उन्हाळ्यात अर्धवट करून काम बंद केले होते. (Rain) पावसाळ्यात पर्यायी पूल वाहून गेला, पुन्हा तयार केला तोही वाहून गेला. पर्यायी पूल तयार करताना नागरिकांनी प्रशासनाला काम मजबूत करण्याची विनंती केली. परंतु थातूरमातूर काम करून पळ काढल्याने देवळीपाडा, निमदर्डा, मोतीजीरा, पांढरफळी, पाटीलफळी, वागदी अशा दहा गावांना दळणवळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. खराब काम करून शासनाची व नागरिकांची डोकेदुखी ठरणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर वरिष्ठांनी कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT