Accident saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: मृत्यूशी झुंज अपयशी; तरुणाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू

मृत्यूशी झुंज अपयशी; तरुणाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

कळंबू (नंदुरबार) : शहादा– लोणखेडा दरम्यान २६ जानेवारील झालेल्या बोलेरो व दुचाकी अपघात झाला होता. या अपघातातील जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज उपचारा दरम्यान अपयशी ठरली. (nandurbar news accident news young man died during treatment)

शहादा (Shahada) तालुक्यातील कळंबू येथील दोन मित्र २६ जानेवारीला लग्नानिमित्त कळंबूहुन सुलतानपूर (ता.शहादा) येथे जात असताना शहादा- लोणखेडा दरम्यान बोलेरो व दुचाकीमध्ये अपघात (Accident) होऊन अजय सुभाष मोरे (वय २४) याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर सोबत असलेला मित्र सागर सोमा सोनवणे (वय २२) याला गंभीर दुखापत झाल्याने शहादा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे (Dhule) येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

एकुलत्या एक मुलाचे निधन

सागरवर गेल्या चार दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न चालू होते. मात्र २९ जानेवारीला सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान सागरची मृत्यूशी झुंज (Accident Death) अपयशी ठरली. सागरचे गेल्या अडीच वर्षापूर्वीच लग्न झाले होते. सर्व काही ठीक चालू असतांना एकुलत्या एक मुलाचे निधन झाल्याने आई– वडिलांची पायाखालची माती सरकली. सागरच्या पच्यात पत्नी, एक आठ महिन्याचा मुलगा, आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू व एक विवाहित बहीण आहे.

दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गाव सुन्न

रोज कुटुंब व मित्र परिवाराच्या सहवासात राहणारे अजय व सागर यांच्या अपघाती निधनांनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन तरुणांचे परिवारातून एकाकी जाणे या मनाला चटके लावण्याऱ्या घटनेमुळे परिवार व गावं सुन्न झाले आहे. अजय अविवाहित होता. त्याच्या पच्यात आई, वडील व दोन भाऊ आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

SCROLL FOR NEXT