Lok Sabha Election
Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ७ तक्रारी; एका तक्रारीची पोलिसात नोंद

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. याची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेसंदर्भात ७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी एका तक्रारीची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. (Live Marathi News)

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता सुरू असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सीव्हीजील ॲपवर तक्रार येताच लागलीच त्याची दखल घेऊन त्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली जात आहे. जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या एकूण ७ तक्रारी सीव्हीजील ॲपवर दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहितेसंदर्भात कडक अंमलबजावणी केली जात असून सीव्हीजील ॲपवर तक्रारी करण्याचे आवाहन व त्याबाबत जनजागृती केली गेली आहे. त्यामुळे जिल्हाभरातून एकूण ७ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. १ तक्रारीसंदर्भात पोलिसात नोंद करण्यात आली असल्याची माहितीही मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT