Shahada News : पाच लाख ५९ हजारांची दारू वाहनासह जप्त; म्हसावद पोलिसांची कारवाई

Nandurbar News : आंतरराज्य सीमा नाकाबंदी या ठिकाणी कारमध्ये अवैध दारूची चोरटी वाहतूक केली जात होती
Shahada News
Shahada NewsSaam tv

शहादा (नंदुरबार) : पोलिसांकडून राज्य तसेच जिल्हा सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी सुरु आहे. या दरम्यान (Nandurbar) गुप्त माहितीकडून मिळालेल्या माहितीवरून म्हसावद पोलिसानी (Police) वाहनासह पाच लाख ५९ हजारांची दारू जप्त केली. (Maharashtra News)

Shahada News
Cyber Crime : घाटीच्या महिला निवासी डॉक्टरला ३ लाखाचा गंडा; नफा मिळवून देण्याचे आमिष

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत खेड दिगर (ता. शहादा) येथील (Shahada) आंतरराज्य सीमा नाकाबंदी या ठिकाणी कारमध्ये अवैध दारूची (Liquor) चोरटी वाहतूक केली जात होती. याबाबतची खात्रीलायक माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांना कळवून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने खेड दिगर नाकाबंदी या ठिकाणी दोन पथकांनी सापळा रचला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahada News
Priyanka Joshi News : आता तुमच्या घरचेच तुम्हाला घरात डांबून ठेवतील; प्रियांका जोशी यांचा आमदार सरवणकर यांच्यावर निशाणा

रात्री दहाच्या सुमारास चालक त्याच्या ताब्यातील वाहनात बिअर बॉक्स व चार लाख ५० हजार किमतीचे वाहन असा एकूण पाच लाख ५९ हजार ४४० रुपये किमतीच्या मुद्देमाल घेऊन जात असताना छाप्यात थांबविले असता तो पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सुनील पाडवी करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com