Cyber Crime : घाटीच्या महिला निवासी डॉक्टरला ३ लाखाचा गंडा; नफा मिळवून देण्याचे आमिष

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील एका डॉक्टराच्या बाबतीत घडला आहे. या प्रकारात तब्बल ३ लाख रुपये गंडविले आहे
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. (Sambhajinagar) अशात व्हाट्सअप ग्रुपवर शेअर मार्केटच्या ट्रेंडिंगमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष देत घाटीतील एका निवासी महिला डॉक्टरला ३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)

Cyber Crime
Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपयांचा फायदा, भरसभेत फडणवीसांची मोठी घोषणा

सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे (Cyber Crime) आमिष दाखवत किंवा गुंतवणुकीतून चांगला नफा तसेच मोबाईलवर विशिष्ट प्रकारचे अँप डाऊनलोड करण्याचे सांगून पैशांची फसवणूक केली जात असते. असाच प्रकार संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील (Ghati Hospital) एका डॉक्टराच्या बाबतीत घडला आहे. या प्रकारात तब्बल ३ लाख रुपये गंडविले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Beed Lok Sabha : ज्योती मेटेंची माघार; बीडमध्ये आता तिरंगी लढतीची शक्यता

रक्कम विड्रॉलच झाली नाही 

घाटी रुग्णालयातील महिला निवासी डॉक्टरला १३ फेब्रुवारीला एक बँक खात्याचा नंबर देऊन त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर महिलेने दोन लाख रुपये पाठविले. त्यावेळी खात्यावर रक्कम वाढल्याचे दिसत होते. मात्र पैसे विड्रॉल होत नसल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी आपली फसवणूक झाली असल्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com