Digital Classroom saam tv
महाराष्ट्र

Digital Classroom: आता नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण; नगरपालिकेच्या ५ शाळा डिजिटल

आता नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण; नगरपालिकेच्या ५ शाळा डिजिटल

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या (Nandurbar) शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे. यासाठी या शैक्षणिक वर्षात नगरपालिकेतील १२ शाळांमधील ५ शाळांचे वर्ग खोल्यां डिजिटल (Digital School) करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या वर्षांपासून आधुनिक शिक्षणाचे (Education) दरवाजे व्हर्च्युअल क्लासरूमच्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी डिजिटल शिक्षण घेण्यासाठी हे दालन उघडण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करण्याची चर्चा सुरू होती. यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी (Bank) बँकेच्या सीएसआर फंडातून ४० लाखाचे मदत मिळवली. या निधीतून नगरपालिकेचे १६ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी ८ लक्ष रुपये एवढा खर्च आला आहे.

अशी आहे डिजीटल क्‍लासरूम

डिजिटल क्लासरूमसाठी ६५ इंची डिजिटल टीव्ही, प्रोजेक्टर, १० बेंचेस, कार्पेट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले. या वर्गांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जात आहे. यासाठी बसवण्यात आलेली एलईडीचा वापर केला जातो. विविध यंत्रणांच्या साहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येते. विद्यार्थ्यांना कोडी, ॲनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण दिले जात आहे.

गरीब विद्यार्थ्यांना लाभ

विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आवड वाढावी, यासाठी पालिकेने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात उर्वरित शाळा देखील डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षापासून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून निश्चितच आर्थिक दुर्लभ घटक व गरीब विद्यार्थ्यांना याच्या फायदा होईल. मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच एकूणच शिक्षणाचा दर्जा उत्तम कसा राहिल याची जवाबदारी राहील. याकडे पालिकेने विशेष लक्ष देण्याचीही गरज राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT