Taloda Taluka Leopard Attack Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News : भयंकर! दोन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, आईच्या डोळ्यादेखतच लेकीचा मृत्यू, परिसरात हळहळ

Taloda Taluka Leopard Attack : आईसोबत शौचालयाला गेलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला बिबट्याने ठार केले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात घडली.

Satish Daud

सागर निकवाडे, साम टीव्ही 

आईसोबत शौचालयाला गेलेल्या दोन वर्षीय चिमुकलीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या रोझवा पुनर्वसन येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तालुक्यात महिन्याभराच्या आत बिबट्याने चौथा बळी घेतल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या नरभक्षक बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अनुष्का जलासिंग पाडवी (वय २ वर्ष) असं मृत चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित केलेल्या रोझवा प्लॉट येथे पाडवी कुटुंबिय राहतात. रविवारी पहाटेच्या सुमारास 2 वर्षीय चिमुकली अनुष्का आपल्या आईसोबत शौचालयाला गेली होती.

यावेळी ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. लेकीला बिबट्याच्या जबड्यात पाहून आईने जोरजोरात आरडाओरड केली. यावेळी परिसरातील नागरिक मदतील धावले. तेव्हा बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या अनुष्काला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता.

धक्कादायक बाब म्हणजे, पहाटे घटना घडल्यानंतरही दुपारी 12 वाजेपर्यंत घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी पोहचले नव्हते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दोन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर वन विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात गोदावरीच्या पट्यात पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकरी घाबरून गेले आहेत. रविवारी रात्री अगर कानडगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. गंगापूर तालुक्यातील गोदावरीच्या पट्यात नेवरगाव, हैबतपुर, अगर कानडगाव, ममदापुर, बगडी या गावात दोन महीण्या पासून बिबट्या फिरत आहे, असे शेतकऱ्यांनी वारंवार सांगितले.

मात्र वनविभागाकडून या बिबट्याला पकडले जात नसल्याने ऊस, कांद्याला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. अगर कानडगाव शिवारात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास राजू शेख हे गाडी घेऊन शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना काकासाहेब दंडे यांच्या शेताजवळ बिबट्या आडवा आला. जीव मुठीत धरून मोठमोठ्याने आवाज करून त्यांनी बिबट्याला पळवून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT