Nashik : आई घरकामात व्यस्त, बिबट्या आला अन् मुलाला घेऊन गेला, नाशिकमधील भयंकर घटना

Leopard Attack : आईच्या डोळ्यासमोर नऊ वर्षांच्या चिमूरड्याला बिबट्याने ओढून नेले. सिन्नरच्या दापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Leopard
Leopard Saam tv
Published On

Nashik Latest News Update : नाशिकमध्ये काळीज पिळवणारी घटना समोर आली आहे. आईच्या डोळ्यासमोरच नऊ वर्षांच्या मुलाला बिबट्याने ओढत नेलं. सिन्नरच्या दापूरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. बिबट्या पोटच्या पोराला घेऊन जात असल्याचं दिसताच आईने आरडाओरड करत मदतीची आर्त हाक दिली. पण बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवण्यात यश आले नाही.

नेमकं काय घडलं?

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रफुल्ल तांबे असं मृत बालकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर उभा असताना बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला शेतात ओढून नेलं. जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडला.

Leopard
Leopard: बाप रे! पुण्याच्या कॉलेजमध्ये बिबट्या; बिबट्याच्या दहशतीने कॉलेज बंद

लाठ्या काठ्या अन् टॉर्चने घेतला शोध, पण...

तांबे कुटुंबियांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या वस्त्यांवरील शेतकरी धावून आले. घराशेजारी बाजरी आणि मक्याचे उंच वाढलेले पीक असल्यानं लाठ्या काठ्या हातात घेऊन टॉर्चच्या उजेडात मदतीला धावलेले तरुण थेट पिकामध्ये घुसले. घरापासून जवळपास पाचशे फूट अंतरावर प्रफुल्ल तांबे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. बिबट्याने त्याला सोडून पलायन केले होते. जखमी प्रफुल्लला तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

Leopard
Dhule News : धुळ्याच्या नकाने तलाव परिसरात बिबट्या जेरबंद; अनेक दिवसांपासून परिसरात होता वावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com