Leopard: बाप रे! पुण्याच्या कॉलेजमध्ये बिबट्या; बिबट्याच्या दहशतीने कॉलेज बंद

Leopard In College: शेत शिवारात, मानवी वस्तीनंतर बिबट्याने थेट पुण्यातील कॉलेजमध्ये एण्ट्री केलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र हा बिबट्या कुठून आला आणि कुठे गेला? यावरचा हा खास रिपोर्ट.
Leopard: बाप रे ! पुण्याच्या कॉलेजमध्ये बिबट्या; बिबट्याच्या दहशतीने कॉलेज बंद
Leopard In College
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

शेतात, मानवी वस्तीत एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरमधील मॉलमध्येही दिसून तुम्ही बिबट्याचा मुक्त संचार पाहिला. .मात्र आता बिबट्याने हद्दच पार करत थेट पुण्यातल्या कॉलेजमध्ये एण्ट्री केलीय.त्यामुळे विद्यार्थ्यांची पळता भुई थोडी झालीय. तर प्रशासनाच्या पाचावर धारण बसलीय. त्यामुळे कॉलेज बंद करण्यात आलंय.

पुण्यातील लोहगावमधील वडगाव शिंदे रस्त्यावर आयआरटी कॉलेज आहे. याच कॉलेजच्या आवारात बिबट्या शिरला आणि तेच दृश्य कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यानं पाहिलं आणि एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्याने काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर अग्निशमन दल, वनविभाग घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याचा शोध सुरु केला. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कॉलेजच्या आवारात 2 बिबटे शिरल्याची माहिती समोर आलीय. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे आमच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणंय.

आरआयटी कॉलेज परिसर आणि भारती विद्यापीठाच्या परिसरात वनविभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू आहे. जंगलात दिसणारे बिबटे आता शेत शिवारापर्यंतच नाही तर थेट शहरांध्ये घुसायला लागले आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची गरज.

Leopard: बाप रे ! पुण्याच्या कॉलेजमध्ये बिबट्या; बिबट्याच्या दहशतीने कॉलेज बंद
Dhule News : धुळ्याच्या नकाने तलाव परिसरात बिबट्या जेरबंद; अनेक दिवसांपासून परिसरात होता वावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com